Posts

Showing posts with the label लेखन

डोह - २

डोह - २            आता मी शुद्धीवर आलो होतो. सगळं नॉर्मल वाटतं होतं.  डॉक्टर कुलकर्णी माझ्या समोर बसले होते.  डॉक्टर म्हणाले "आता कसं वाटतंय ?".  मी म्हणालो  "मी इथे कसा आलो डॉक्टर? मला प्लीज सांगा हे काय चालू आहे ?" ते म्हणाले  "शांत हो, नीरज.. , मी तुला सर्व सांगणार आहे ..... relax " …. "तू इथे आलास तेव्हा तू बेशुद्ध होतास, तू बस मध्ये बसला असताना …….तू झोपी गेलास ....... नंतर बस ड्रायवर ने तुला उठवण्याचा प्रयत्न केला ...  पण काही उपयोग झाला  नाही ...  शेवटी त्याने तुला इथे admit केले ....... आम्ही तुझ्या नातेवाइकाना inform केलंय ते इतक्यात पोहचले सुद्धा असतील ........" डॉक्टर जणू काहीच घडलं नव्हत अस दाखवत होते . त्यांनी डोळ्यांवरचा चष्मा काढला ........ आणि बाजूच्या टेबल वर ठेवत म्हणाले .......  "नीरज , dont worry मला सांग काय झालं होतं तुला ?" डॉक्टरांच्या ह्या प्रश्नांवर मी काय उत्तर देऊ तेच सुचत नव्हत ....... मी आठवायला लागलो ....... माझा चेहरा पाहून डॉक्टर म्हणाले...

डोह - १

डोह - १ उसळत्या लाटांमधून वाट काढत ..... माझी नाव चालली होती … आकाश तांबडं होत... पाऊस पडत नव्हता ... पण ऐकून सार वातावरण भयानक होत होतं .  तोंडावर उसळणार्या पाण्यामुळ डोळे मधून मधून बंद होत होते ... दूर दूर वर काहीच नव्हत … होता तो फक्त उसळणारा भयानक समुद्र ... जलद गतीने वाहणारा तो वारा … काही सुचण्या पलीकडची परिस्थितीत मी अडकलो होतो……. मनाशी केलेला निर्धार ढळला होता .... निसर्गाच्या तांडवा पुढे आपला टिकाव लागणं मुश्किल वाटतं होतं … लाटांचा तो येउन नावेवर आदळण्याचा आवाज डोक सुन्न करत होता … आणि मधेच … अचानक … वळून पाहिलं  तर … डावीकडे दूर काहीतरी दिसलं … अस्पष्टस काहीतरी …काही सावल्या होत्या … का अजून काही … अंधुक दिसायला लागलं । मोठ्या मोठ्या दोन मुर्त्या … अचानक सगळ शांत झाल... कुठेच लाट नाही ना तो भयानक समुद्र … अजून मी नावेतच होतो … पण पाणी शांत होत … वार्याची मंद झुळूक … अंगांगाला स्पर्शून गेली ...  पण माझ लक्ष कुठेच नव्हत … ते एकवटल होत त्या दोन मुर्त्यांवर ..... विशालकाय दोन मुर्त्या … अजून नीटसं दिसत नव्हत…. सूर्यप्रकाशामुळे त्या मुर्त्यांवर सावली आली होती...
Image
चकवा --------------------------------------------------------------------------------- ही गोष्ट आहे ती सांगली जिल्ह्यातील एका एकदम आडवळणी  असणाऱ्या गावाची..त्या गावाचं नाव.. रान्जेगाव.. ह्या गावाला जायचं म्हणजे तितक कठीण नाहीये.. एकदा सुरेखा आणि तिच्या घरतल्या लोकांनी ठरवलं कि आपण रान्जेगाव ला जाऊयात..कारण रान्जेगाव ला सुरेखा चे मामा राहायचे.. जे फार वर्षांपासून कोणाच्याच संपर्कात नव्हते..तसे त्यांच्या गावी जायचे कधी ठरवले नव्हते.. म्हणून बर्याच वर्षातून गावी आल्यावर..मामांकडे जाऊन यायचं असं ठरलं.  सुरेखाच्या बाबांनी..गाडी केली होती..अन सुरेखा, तिचे आई बाबा अन छोटा भाऊ अन एक मावशी..असे सगळे जन सुरेखाच्या बाबांच्या गावी, म्हणजे साहुवाडा. बाबांनी केलेल्या गाडीत एक ड्रायवर सुद्धा होता.. रफ़िक़ नाव त्याच.. फारच गंभीर चेहर्याचा..पूर्ण प्रवासात एकदा सुधा त्याने आपल्या चेहऱ्यावरील हाव भाव बदलले नव्हते..तो कोणाशीच काहीच बोलला नव्हता..बाबानी  सुद्धा वेगवेगळे विषय काढून बोलायचा प्रयत्न केला..पण..त्याने जास्त प्रतिसाद दिला नाही.. बाबांच्या गावावरून.. रान्जेगाव ला जायला का...

१० :१५ ची CST लोकल

१० :१५ ची CST  लोकल             ट्रेन सुटली ..धावता   धावताच  तो चढला .. धावत पळत..  कसा बसा गर्दीतून तो आत शिरला.. आत मध्ये येताच क्षणी त्याची नजर पुढच्या   दरवाज्या जवळ… तो  पूर्णपणे कावरा बावरा.. बहुतेक त्याची नजर तिलाच शोधात   असावी.. बराच वेळ..त्याने पाहिलं .. पुढच्या दोन्ही दरवाज्यांजवळ येऊन   पाहिलं..  त्याच्या नजरेत..एक भीती.. एक हुरहूर.. तिच्याबद्दलची काळजी.. दिसत होती..  त्याने गर्दीतून शेवटी वाट काढत पुढच्या  दरवाज्याजवळ येऊन परत खात्री   केली.. रुमाल  काढून घाम पुसला..लगेच काहीतरी आठवल्यासारख त्याने ..आपला   मोबाईल फोन बाहेर काढला.. मोबाईल मध्ये नंबर शोधून..लगेच फोन केला..  नुसताच हेलो  हेलो ऐकू आलं ..तिकडून काहीच आवाज येत नसावा.. त्याने   पुन्हा प्रयत्न केला.. पण मात्र नाईलाज.. शेवटी त्याने.. शांत राहण्याचा   निर्णय घेतला..!  पण..शांत  राहून सुद्धा..तो इकडे तिकडे पाहत होता..कि ती...