Posts

Showing posts from 2017

नो स्मोकिंग

नो स्मोकिंग : गोष्ट सुरु होते ते, कडेगाव तालुक्यातील लहान श्या गावातील । कडेपूर हे तसं शहरगाव, पण त्याच जवळ भाळवणी नावाचे एक लहानसे गाव आहे .  या गावाची ओळख म्हणजे, इथे भरणारा बाजार, शेतातली ताजी फळे, भाज्या एवढंच न्हवे तर विविध प्राण्यांचा सुद्धा बाजार भरतो बैल,बकरी वगैरे. बऱ्याच गावातून लोकं इथे बाजाराला यायचे कडेपुरात एक शेतकरी राहत होता, त्याचे नाव मनोहर. मनोहर दिवसभर शेतात राबायचा, त्याची बायको घर सांभाळायची। अधूनमधून बाजारानिम्मित त्याला भाळवणी ला जाव लागायचं.  भाळवणी गावावरून परती  ची शेवटची एस. टी. ती संध्याकाळी ७ ची. ही एस. टी.चुकली तर चालत येण्याशिवाय पर्याय राहत नाही.  मनोहर ने शेतातला उस विकून नुकत्याच आलेल्या मिळकतीत शेळ्या घ्यायचे ठरवले. जेणे करून त्याच्या संसाराला हातभार लगेल.  मनोहर ने बायकोला विचारलं तिने सुद्धा समंती दिली . शेळ्या विकत घेण्यासाठी एके दिवशी मनोहर भाळवणी च्या बाजाराला जायला निघाला. शेवटची एस टी चुकावाल्यास रात्री परत यावा लागणार ह्याची कल्पना असल्यामुळे त्याने battery आणि त्याची आवडती बीडी घेतली होती सोबत. शेतातली राहिलेली कामं आवरून