Posts

Showing posts from September, 2016

डोह - २

डोह - २            आता मी शुद्धीवर आलो होतो. सगळं नॉर्मल वाटतं होतं.  डॉक्टर कुलकर्णी माझ्या समोर बसले होते.  डॉक्टर म्हणाले "आता कसं वाटतंय ?".  मी म्हणालो  "मी इथे कसा आलो डॉक्टर? मला प्लीज सांगा हे काय चालू आहे ?" ते म्हणाले  "शांत हो, नीरज.. , मी तुला सर्व सांगणार आहे ..... relax " …. "तू इथे आलास तेव्हा तू बेशुद्ध होतास, तू बस मध्ये बसला असताना …….तू झोपी गेलास ....... नंतर बस ड्रायवर ने तुला उठवण्याचा प्रयत्न केला ...  पण काही उपयोग झाला  नाही ...  शेवटी त्याने तुला इथे admit केले ....... आम्ही तुझ्या नातेवाइकाना inform केलंय ते इतक्यात पोहचले सुद्धा असतील ........" डॉक्टर जणू काहीच घडलं नव्हत अस दाखवत होते . त्यांनी डोळ्यांवरचा चष्मा काढला ........ आणि बाजूच्या टेबल वर ठेवत म्हणाले .......  "नीरज , dont worry मला सांग काय झालं होतं तुला ?" डॉक्टरांच्या ह्या प्रश्नांवर मी काय उत्तर देऊ तेच सुचत नव्हत ....... मी आठवायला लागलो ....... माझा चेहरा पाहून डॉक्टर म्हणाले  "राहू दे नीरज तू आता आराम कर मग आपण बोलू " अस म्हणत ते

डोह - १

डोह - १ उसळत्या लाटांमधून वाट काढत ..... माझी नाव चालली होती … आकाश तांबडं होत... पाऊस पडत नव्हता ... पण ऐकून सार वातावरण भयानक होत होतं .  तोंडावर उसळणार्या पाण्यामुळ डोळे मधून मधून बंद होत होते ... दूर दूर वर काहीच नव्हत … होता तो फक्त उसळणारा भयानक समुद्र ... जलद गतीने वाहणारा तो वारा … काही सुचण्या पलीकडची परिस्थितीत मी अडकलो होतो……. मनाशी केलेला निर्धार ढळला होता .... निसर्गाच्या तांडवा पुढे आपला टिकाव लागणं मुश्किल वाटतं होतं … लाटांचा तो येउन नावेवर आदळण्याचा आवाज डोक सुन्न करत होता … आणि मधेच … अचानक … वळून पाहिलं  तर … डावीकडे दूर काहीतरी दिसलं … अस्पष्टस काहीतरी …काही सावल्या होत्या … का अजून काही … अंधुक दिसायला लागलं । मोठ्या मोठ्या दोन मुर्त्या … अचानक सगळ शांत झाल... कुठेच लाट नाही ना तो भयानक समुद्र … अजून मी नावेतच होतो … पण पाणी शांत होत … वार्याची मंद झुळूक … अंगांगाला स्पर्शून गेली ...  पण माझ लक्ष कुठेच नव्हत … ते एकवटल होत त्या दोन मुर्त्यांवर ..... विशालकाय दोन मुर्त्या … अजून नीटसं दिसत नव्हत…. सूर्यप्रकाशामुळे त्या मुर्त्यांवर सावली आली होती …मागे तांबडं