Posts

Showing posts from 2011

निशा - एक हृदयस्पर्शी कथा

Image
निशा - एक हृदयस्पर्शी कथा ...                     एका छोटुश्या गावात राहणारी निशा..आणि तिचे आई बाबा .. घर तसं छोटंसंच..   शेताच्या अलीकडे बांधलेली एक झोपडी.. तिचा काहीसा भाग पावसाळ्यात   पडलेला..मोलमजुरी करून कसे बसे जगणे त्यांचे..बाप दारूत वाया गेलेला..घरात   लक्ष नसायचं.. निशा तशी खूप हुशार.. पण घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे   शाळेत जाणे तिला शक्य नव्हते..हातावरचं पोट बिचाऱ्यांच..डिसेंबर महिना आणि   त्यात शेतं ओसाड पडलेली..कठीण परिस्तिथी आली होती त्यांच्या नशिबी..तरी पण   आईने हार  मानली नव्हती..तिने तिचं शिवणकाम परत सुरु केलं. जुनी मशीन होती   तिची दुरुस्ती करून तिने कामाला सुरवात केली होती. कसेही करून निशाला   दिवसातून दोन वेळेला तरी ती जेवू घालायची...अंगानी सडपातळ.. कपाळावर मोठं   कुंकू.. अंगावर एक पण दागिना नाही... हिरवं लुगडं नेसलेली..असं काहीसं तिचं   वर्णन..जीवाचं रान करून निशाला मोठ करायचं हेच तीच स्वप्न..               निशा म्हणजे एक बोलकी बाहुली होती..लुकलुकणारे डोळे, सदैव खटयाळ हसू   गालावर...गप्पा गोष्टीत तर ती सगळ्यात पुढे असायची.. प्रत्येक

स्वप्न.....

Image
स्वप्न.....