Posts

Showing posts from 2014

गर्द काळोख्या निशेला

Image

तेजस्वी सुर्यतारा...

Image

दूर रानात ..

Image

Receiver...

Image
Image
चकवा --------------------------------------------------------------------------------- ही गोष्ट आहे ती सांगली जिल्ह्यातील एका एकदम आडवळणी  असणाऱ्या गावाची..त्या गावाचं नाव.. रान्जेगाव.. ह्या गावाला जायचं म्हणजे तितक कठीण नाहीये.. एकदा सुरेखा आणि तिच्या घरतल्या लोकांनी ठरवलं कि आपण रान्जेगाव ला जाऊयात..कारण रान्जेगाव ला सुरेखा चे मामा राहायचे.. जे फार वर्षांपासून कोणाच्याच संपर्कात नव्हते..तसे त्यांच्या गावी जायचे कधी ठरवले नव्हते.. म्हणून बर्याच वर्षातून गावी आल्यावर..मामांकडे जाऊन यायचं असं ठरलं.  सुरेखाच्या बाबांनी..गाडी केली होती..अन सुरेखा, तिचे आई बाबा अन छोटा भाऊ अन एक मावशी..असे सगळे जन सुरेखाच्या बाबांच्या गावी, म्हणजे साहुवाडा. बाबांनी केलेल्या गाडीत एक ड्रायवर सुद्धा होता.. रफ़िक़ नाव त्याच.. फारच गंभीर चेहर्याचा..पूर्ण प्रवासात एकदा सुधा त्याने आपल्या चेहऱ्यावरील हाव भाव बदलले नव्हते..तो कोणाशीच काहीच बोलला नव्हता..बाबानी  सुद्धा वेगवेगळे विषय काढून बोलायचा प्रयत्न केला..पण..त्याने जास्त प्रतिसाद दिला नाही.. बाबांच्या गावावरून.. रान्जेगाव ला जायला काही साधन नव्हत.