Posts

Showing posts from April, 2020

डोह - 3

विचारमग्न अवस्थेत मी बुडलो होतो ..... या घटनेचा माझ्या पूर्व आयुष्याशी काही संबंध असेल का ? हा प्रश्न मला सारखा पडत होता...रात्रीचे ९.०० वाजले होते... बाहेर पाउस पडत होता ... मनस्थिती खराब असल्यामुळे मी घरातच बसून होतो .. वार्याचा सळसळ वाढली होती ……....बाहेरच्या रस्त्यावरील दिव्याचा प्रकाश पडत होता ....... मी पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत होतो ... पण पावसाचा जोर वाढला .... मुसळधार पावसाचा तो आवाज... माझ लक्ष विचलित करत होता… तेवढ्यात आईचा आवाज "आला नीरज जेवायला ये" ... मी पुस्तक तिथेच टाकून खाली गेलो ……. बाबा समोर आजीच्या बाजूला बसले होते …… निशांत व आई माझ्या बाजूलाच बसले होते .... जेवता जेवता बाबां म्हणाले … "नीरु, ठीक वाटतंय  ना तुला आता" ? मी हो म्हंटल … आतून खूप अस्ताव्यस्त परिस्थिती झाली होती .. विषय बदलावा म्हणून आई लगेच म्हणाली..... "तुला बरं वाटत असेल तर तू college join  कर", मी मान हलवली..... पूर्ण वेळ मी शांतच होतो …  कारण काही बोलण्याच्या मनःस्थितीत    नव्हतो मी ... वर झोपयला गेलो ……. खूप वेळ झाला पण झोप येतच नव्हती … मनाला परत त्या समुद्राच