डोह - 3

विचारमग्न अवस्थेत मी बुडलो होतो ..... या घटनेचा माझ्या पूर्व आयुष्याशी काही संबंध असेल का ?
हा प्रश्न मला सारखा पडत होता...रात्रीचे ९.०० वाजले होते... बाहेर पाउस पडत होता ... मनस्थिती खराब असल्यामुळे मी घरातच बसून होतो .. वार्याचा सळसळ वाढली होती ……....बाहेरच्या रस्त्यावरील दिव्याचा प्रकाश पडत होता ....... मी पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत होतो ... पण पावसाचा जोर वाढला .... मुसळधार पावसाचा तो आवाज... माझ लक्ष विचलित करत होता… तेवढ्यात आईचा आवाज "आला नीरज जेवायला ये" ... मी पुस्तक तिथेच टाकून खाली गेलो ……. बाबा समोर आजीच्या बाजूला बसले होते …… निशांत व आई माझ्या बाजूलाच बसले होते .... जेवता जेवता बाबां म्हणाले … "नीरु, ठीक वाटतंय  ना तुला आता" ? मी हो म्हंटल … आतून खूप अस्ताव्यस्त परिस्थिती झाली होती .. विषय बदलावा म्हणून आई लगेच म्हणाली..... "तुला बरं वाटत असेल तर तू college join  कर", मी मान हलवली..... पूर्ण वेळ मी शांतच होतो …  कारण काही बोलण्याच्या मनःस्थितीत    नव्हतो मी ...

वर झोपयला गेलो ……. खूप वेळ झाला पण झोप येतच नव्हती … मनाला परत त्या समुद्राचे वेध लागले होते ....... त्या दोन्ही बुद्धांच्या मुर्त्या होत्या…… त्यावरचे ते निद्रेचे भाव ……डोह ... मला सगळं आठवत होतं... मी विचार झटकून … पुस्तकावर लक्ष केंद्रित केलं ..... वाचता वाचता .... मधेच अचानक ... एक भास झाला काहीतरी … gallery तून एक सावली ……. खूप वेगाने गेल्यासारख वाटलं ......मी धीर करून gallery च्या पडद्या आड जाऊन पाहिलं ……. कोणीच नव्ह्त ..... झाडे  वार्यावर डोलत होती ....  मला वेड लागतंय कि काय असं वाटत होतं ... पुन्हा मी दार घट्ट लावून घेतलं आणि झोपी गेलो ......

सकाळी आईच्या हाकेने जागा झालो ..... "नीरु … ए नीरु उठ आता .... खूप उशीर झाला बाळा.. " मी डोळे मिचकावत उठलो ...... आज college ला जायचं म्हणून खूप उत्साह होता ..... मी पटपट तयारी केली … आणि बस स्टोप ला पोहचलो ..... आज मी college entry  केली ..... माझे मित्र बाहेरच कट्ट्यावर गप्पा मारत बसले होते ...... सुरज म्हणाला "या या साहेब ........ ये गणप्या चल उठ ...... साहेबांना बसायला जागा दे …….", मी हसलो … "साहेबांना कटिंग आणा … " , मी म्हंटल "काय रे सुऱ्या आज स्पेशल ट्रीटमेंट का ?" म्हणे आज आमचे शूरवीर नीरज साहेब आलेत खूप दिवसातून म्हणून " बरं वाटलं … मित्रांसोबत वेळ घालवायला खूप गम्मत वाटते ना :)… सुऱ्या म्हणाला   "अरे त्या ढापण्याच लेक्चर आहे रे ... जाम पकवतो साला …मलाचं प्रश्न विचारतो सगळे ....... " मी म्हंटल "अर्रे तूच तर scholar वाटतो ना त्याला " बाकी सगळे हसले :)

आम्ही गप्पा नंतर पुढच्या लेक्चर ला गेलो...... दुपारी डब्बा खाऊन बाहेर निघालो ... आणि चौपाटी वर टाईम पास करून रात्री घरी आलो ...... आजचा दिवस मस्त होता ..... एकदम टेन्शन फ्री...
बऱ्याच दिवसानंतर माझ्या निरस आणि निस्तेज आयुष्यातून काहीसा वेळ चांगला गेला ...


Comments

Popular posts from this blog

निशा - एक हृदयस्पर्शी कथा