Posts

Showing posts from March, 2012

१० :१५ ची CST लोकल

Image
१० :१५ ची CST  लोकल             ट्रेन सुटली ..धावता   धावताच  तो चढला .. धावत पळत..  कसा बसा गर्दीतून तो आत शिरला.. आत मध्ये येताच क्षणी त्याची नजर पुढच्या   दरवाज्या जवळ… तो  पूर्णपणे कावरा बावरा.. बहुतेक त्याची नजर तिलाच शोधात   असावी.. बराच वेळ..त्याने पाहिलं .. पुढच्या दोन्ही दरवाज्यांजवळ येऊन   पाहिलं..  त्याच्या नजरेत..एक भीती.. एक हुरहूर.. तिच्याबद्दलची काळजी.. दिसत होती..  त्याने गर्दीतून शेवटी वाट काढत पुढच्या  दरवाज्याजवळ येऊन परत खात्री   केली.. रुमाल  काढून घाम पुसला..लगेच काहीतरी आठवल्यासारख त्याने ..आपला   मोबाईल फोन बाहेर काढला.. मोबाईल मध्ये नंबर शोधून..लगेच फोन केला..  नुसताच हेलो  हेलो ऐकू आलं ..तिकडून काहीच आवाज येत नसावा.. त्याने   पुन्हा प्रयत्न केला.. पण मात्र नाईलाज.. शेवटी त्याने.. शांत राहण्याचा   निर्णय घेतला..!  पण..शांत  राहून सुद्धा..तो इकडे तिकडे पाहत होता..कि ती  कुठे बसली तर   नाहीये ना..!                                    खर तर.. त्याची ही रोजची सवय झाली होती.. रोज स्टेशन वर   त्याने तिची वाट  पाहणे.. तिचे ट्रेन मध्ये