चकवा
---------------------------------------------------------------------------------

ही गोष्ट आहे ती सांगली जिल्ह्यातील एका एकदम आडवळणी  असणाऱ्या गावाची..त्या गावाचं नाव.. रान्जेगाव.. ह्या गावाला जायचं म्हणजे तितक कठीण नाहीये.. एकदा सुरेखा आणि तिच्या घरतल्या लोकांनी ठरवलं कि आपण रान्जेगाव ला जाऊयात..कारण रान्जेगाव ला सुरेखा चे मामा राहायचे.. जे फार वर्षांपासून कोणाच्याच संपर्कात नव्हते..तसे त्यांच्या गावी जायचे कधी ठरवले नव्हते.. म्हणून बर्याच वर्षातून गावी आल्यावर..मामांकडे जाऊन यायचं असं ठरलं. 
सुरेखाच्या बाबांनी..गाडी केली होती..अन सुरेखा, तिचे आई बाबा अन छोटा भाऊ अन एक मावशी..असे सगळे जन सुरेखाच्या बाबांच्या गावी, म्हणजे साहुवाडा.
बाबांनी केलेल्या गाडीत एक ड्रायवर सुद्धा होता.. रफ़िक़ नाव त्याच.. फारच गंभीर चेहर्याचा..पूर्ण प्रवासात एकदा सुधा त्याने आपल्या चेहऱ्यावरील हाव भाव बदलले नव्हते..तो कोणाशीच काहीच बोलला नव्हता..बाबानी  सुद्धा वेगवेगळे विषय काढून बोलायचा प्रयत्न केला..पण..त्याने जास्त प्रतिसाद दिला नाही..

बाबांच्या गावावरून.. रान्जेगाव ला जायला काही साधन नव्हत.. रान्जेगाव आड वळणी असल्यामुळे, तिकडे फारशी वाहनांची सोय नव्हती.. गाडी ने पोहचायला जेमतेम ३ तास लागतात.. ठरल्या दिवशी सगळे जन..उत्साहाने गाडीत बसले..संध्याकाळी ७ ला सगळे जन निघाले... रफिक ने गाडी व्यवस्थित आणली.. नंतर एका धाब्याजवळ थांबून पुढच्या रस्त्यांची चौकशी केली.. सगळी माहिती गोळा केल्यालावर..ते सगळे पुन्हा पुढे निघाले...साडे आठ होत आले ...गाडीतली मंडळी...कंटाळून..झोपायचा प्रत्यन करत होती... पण प्रवास जास्त मोठा नसल्याने..झोपायचं काही कारण नव्हत कोणाला.. बाबा पुढे रफ़िक़ च्या बाजूला बसले होते..आणि आई मावशी आणि सुरेखा,  मधल्या सीट वर आणि शेवटच्या सीटवर राजू झोपला होता..

रात्रीचे साडे ९ होत आले, रस्त्याच्या डाव्या बाजूला पाटी दिसली, रान्जेगाव सरळ, पलूस डावीकडे अन रामपूर उजवीकडे.. त्याप्रमाणे रफ़िक़ ने गाडी सरळ नेली..गाडीचा वेग जास्त नसल्या कारणाने ती पाटी सहज दिसली.. सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती कि..कधी एकदा आपण मामाच्या गावाला पोहचतोय..आता थोडी भूक पण लागायला लागली होती.. .. ..

आता १०:३० होत आले होते, जी पाटी आम्ही दीड तास आधी पहिली होती तशीच्या तशी पाटी पुन्हा पहिली.. काही तरी वेगळ घडत असल्याची शंका बाबांच्या डोक्यात आली..बाजूला..तेच घर होतं..बाबांना काही कळेना..त्यांनी रफ़िक़ ला विचारल..एकदा..पण त्याने नेहमीसारखा थंड प्रतिसाद दिला..रस्ते तेच वाटत होते.. वळणं सुद्धा तीच..पण काहीतरी चूकत होतं.. बाबांनी रफ़िक़ कडे बघितलं रफ़िक़ पूर्णपणे घामाघूम झाला होतां.. बाबांनी गाडी थांबवण्यास सांगितले.. रफ़िक़ने  गाडी थांबवली..पण..त्याची बोलती बंद झाली होती..त्याला काय बोलाव तेच कळत नव्हत.. आईने  रफ़िक़ ला प्रश्न विचारण्यास सुरवात केली.. रफ़िक़ने धीर धरून आईना सांगितल..कि "आंटीजी, मे कब से वोही सोच रहा हु..कि मे फिरसे वोही जगह पे क्यू आ राहा हु और वोह भी कैसे?"  तो फारच घाबरला होता..त्याचे शब्द ऐकून..आई अन बाबा दोघांना भीती वाटली..बाबांनी कसे बसे रफ़िक़ ला धीर देत म्हंटल..कि चलो हम किसीसे पुछते हे कि रांजेगाव कैसे जाना हे" 

काही वेळ शांतता पसरली होती.. ज्या ठिकाणी गाडी उभी केली होती..तिकडे..काळाकुट्ट अंधार होता, हवा थंड होती.. झाडांच्या पानांचा सळसळ आवाज अंगावर काटा आणत होता... तेवढ्यात... एक व्यक्ती फार लांबून चालत येताना दिसली.. बाबा आणि रफिक गाडीतच बसले होते.. रफिक तर पुरता बावरला होता.. तो माणूस गाडीच्या दिशेने येताना दिसताच..बाबांना धीर आला..ते side mirror मधून त्या माणसाला पाहत होते..  त्यांनी लगेच दरवाजा खोलला आणि ते त्या व्यक्ती कडे जाऊन पोहचले..  आई आणि सुरेखा फारच घाबरलेल्या स्तिथीत होत्या.. कुठे फसलोय आपण तेच कळत नव्हत.. आई मागे वळून पाहत होती.. त्या माणसाने...पांढरा सदरा आणि पांढर धोतर  घातलं होतं, लांबून इतक स्पष्ट दिसत नव्हत.. पण बाबा हातवारे करत त्यांच्याशी बोलत होते....

अचानक...आई ची नजर..रफिक कडे गेली.. रफिक चा चेहरा..फारच भयानक झाला होता..त्याच्या अंगात थंडी शिरली होती..आणि तो इतक्या जोरात कापत होता कि.. आई आणि सुरेखा फारच घाबरल्या....आई ने रफिक ला विचारला काय झाल तुला? रफिक काहीच बोलत नव्हता.. थोड्या वेळाने लक्षात आला.. कि तो side mirror कडे पाहत होता... आई ने हिम्मत करून side mirror पाहिला..आणि..तिची जोरात किंचाळली...."देवा....!".. सुरेखा रडायला लागली.. तिला काहीच कळत नव्हत कि काय चाललय ... बाबांचं काहीच लक्ष नव्हत इथे..ते त्या माणसाशी बोलण्यात इतके दंग झाले होते..कि त्यांना भानच नव्हत राहिलं.. side mirror   मध्ये..बाबा एकटेच हातवारे करत बोलत होते.. आणि ते दृश्य इतकं..भयानक होतं कि..आईची वाचा बसली होती....खूप धीर करून तिने.. बाबांना हाक मारली.. बाबा ऐकत नव्हते.. शेवटी..जे होईल ते होईल..असा विचार करून ती निघाली.. दरवाजा खोलला..सुरेखा ला..मिठी मारली...आणि म्हणाली "सुरु .. मी येतेच.. राजू ची काळजी घे" हे असे शब्द आईच्या तोंडून कधीच ऐकले नव्हते.. आई ने बाहेर पहिला..ती व्यक्ती तिथेच दिसत होती.. आणि एकदम मनमोकळेपणाने   गप्पा मारत होती... आई ने बाबांना नजरेनी खुणावले..पण बाबा पूर्णपणे अडकले होते.. आईने बाबांचा हात धरला..आणि म्हंटले "चला..आता..रस्ता मिळालाय.." बाबा म्हणाले " कसा काय? " अगं हे रावजी पाटील..रांजेगाव चे आहेत.. यांनी आताच रस्ता सांगितला..."... आई म्हणाली..बर ठीक आहे..चला पटकन..रफिक ने बोलवलं आहे. . ती व्यक्ती..हसली..अन म्हणाली.. "वाचलास रे बाबा.. जा खुशाल...जा" बाबांना काहीच कळल नाही.. ते..त्या माणसाकडे पाहत राहिले..आई ने त्यांना ओढतच गाडीपर्यंत नेल..आणि म्हणाली..चला  रफिक बोलवतोय .. रफिक तोवर सावरला होता..आई ने मागे वळून पहिले..ती व्यक्ती कुठे गायब झाली ते कळलच नाही... गाडी बाबांनी सांगितलेल्या रस्त्याने नेली.. आणि..१० मिनिटाच्या आत.. सगळे..मामांच्या गावी पोहचलो..मामा बाहेरच चिंताग्रस्त होऊन वाट पाहत बसले होते.. मामांना पाहताच... आई मिठी मारून रडायला लागली...झालेला सगळा प्रकार आईने..नंतर..सांगितला ...आणि..बाबा आजारीच पडले.. "रावजी पाटील हे नाव ऐकल्यावर..मामा हडबडले  .. त्यांनी रावजी पाटील..हि व्यक्ती..खूप वर्षाआधी त्याच जागेवर मरण पावली होती.. असे सांगितले..आणि ते पण रात्री अंधारात एका गाडीने त्यांना उडवलं होतं.. आई बाबा.. आणि सुरेखा.. खूप घाबरले होते.. मामानी धीर देत..त्यांना सावरलं..आणि चकव्या तून बाहेर पडल्या बद्दल आईच खूप कौतुक केल.. 

पण आज पण त्या रस्त्याने ..रात्रीच कोणीच प्रवास करत नाही........रांजेगाव आडवळणी आहे..आणि तो रस्ता..म्हणजे..चकवा.....जिथे वाट वाटेलाच शोधते.....पण सापडत मात्र काही नाही.......दिसतो तो फक्त अंधार........अन अंधारातल्या..अतृप्त सावल्या....

फुलपाखरू

Comments

Popular posts from this blog

निशा - एक हृदयस्पर्शी कथा