डोह - २

डोह - २
           आता मी शुद्धीवर आलो होतो. सगळं नॉर्मल वाटतं होतं.  डॉक्टर कुलकर्णी माझ्या समोर बसले होते.  डॉक्टर म्हणाले "आता कसं वाटतंय ?".  मी म्हणालो  "मी इथे कसा आलो डॉक्टर? मला प्लीज सांगा हे काय चालू आहे ?" ते म्हणाले  "शांत हो, नीरज.. , मी तुला सर्व सांगणार आहे ..... relax " …. "तू इथे आलास तेव्हा तू बेशुद्ध होतास, तू बस मध्ये बसला असताना …….तू झोपी गेलास ....... नंतर बस ड्रायवर ने तुला उठवण्याचा प्रयत्न केला ...  पण काही उपयोग झाला  नाही ...  शेवटी त्याने तुला इथे admit केले ....... आम्ही तुझ्या नातेवाइकाना inform केलंय ते इतक्यात पोहचले सुद्धा असतील ........" डॉक्टर जणू काहीच घडलं नव्हत अस दाखवत होते . त्यांनी डोळ्यांवरचा चष्मा काढला ........ आणि बाजूच्या टेबल वर ठेवत म्हणाले .......  "नीरज , dont worry मला सांग काय झालं होतं तुला ?" डॉक्टरांच्या ह्या प्रश्नांवर मी काय उत्तर देऊ तेच सुचत नव्हत ....... मी आठवायला लागलो ....... माझा चेहरा पाहून डॉक्टर म्हणाले  "राहू दे नीरज तू आता आराम कर मग आपण बोलू " अस म्हणत ते उठले ....... तितक्यात आई त्या वार्ड च्या दरवाज्या जवळ आली ........

              तिला पाहून मला आनंद झाला ......... अचानक रडावस वाटत होतं ....... आई धावत माझ्याजवळ आली , मला जवळ घेतलं म्हणाली  "काय झालं नीरु ?" ठीक तर आहेस ना तू ? " मला काय म्हणावं  सुचत नव्हत....... कारण घडलेल्या घटनेच मलाच आश्चर्य वाटत होतं " , मी म्हणालो "हो आई मी ठीक आहे ". "मला काहीच आठवत नाहीये " , आईने मायेनी माझ्याकडे पाहिलं आणि मला धीर देत म्हणाली "घाबरू नकोस, तू बरा झाल्यावर आपण लगेच जाऊ इथून" . मी डॉक्टरांना भेटून येते ..... आई बाहेर गेली ...... माझ विचार चक्र सुरूच होतं ..... आपण सकाळी तर कॉलेज ला जायला निघालो होतो ...... ते पण rickshaw  ने ...... मग डॉक्टर कसे म्हणाले कि मी बस मध्ये होतो ? मला विश्वास बसत नव्हता मी बस मध्ये कसा काय आलो?... विचारचक्र सुरु असताना..... मधेच फोन वाजला ......फोन सुरज चा होता ...... मी फोन कट  केला ...... कारण काही बोलायची इच्छा नव्हती माझी ...... त्याच दिवशी मला discharge मिळाला ......

Comments

Popular posts from this blog

निशा - एक हृदयस्पर्शी कथा