डोह - १

डोह - १

उसळत्या लाटांमधून वाट काढत ..... माझी नाव चालली होती … आकाश तांबडं होत... पाऊस पडत नव्हता ... पण ऐकून सार वातावरण भयानक होत होतं .  तोंडावर उसळणार्या पाण्यामुळ डोळे मधून मधून बंद होत होते ... दूर दूर वर काहीच नव्हत … होता तो फक्त उसळणारा भयानक समुद्र ... जलद गतीने वाहणारा तो
वारा … काही सुचण्या पलीकडची परिस्थितीत मी अडकलो होतो……. मनाशी केलेला निर्धार ढळला होता .... निसर्गाच्या तांडवा पुढे आपला टिकाव लागणं मुश्किल वाटतं होतं … लाटांचा तो येउन नावेवर आदळण्याचा आवाज डोक सुन्न करत होता … आणि मधेच … अचानक … वळून पाहिलं  तर … डावीकडे दूर काहीतरी
दिसलं … अस्पष्टस काहीतरी …काही सावल्या होत्या … का अजून काही … अंधुक दिसायला लागलं ।
मोठ्या मोठ्या दोन मुर्त्या … अचानक सगळ शांत झाल... कुठेच लाट नाही ना तो भयानक समुद्र … अजून मी नावेतच होतो … पण पाणी शांत होत … वार्याची मंद झुळूक … अंगांगाला स्पर्शून गेली ...  पण माझ लक्ष कुठेच नव्हत … ते एकवटल होत त्या दोन मुर्त्यांवर ..... विशालकाय दोन मुर्त्या … अजून
नीटसं दिसत नव्हत…. सूर्यप्रकाशामुळे त्या मुर्त्यांवर सावली आली होती …मागे तांबडं आकाश आणि..या मुर्त्या … जणू आकृत्या दिसत होत्या … जसा मी मूर्तीच्या जवळ जात आलो तश्या त्या मुर्त्या विशाल होत चालल्या … काही सुचेनासं झालं ....  पण पायांत जणू बळ आलं होतं … या मुर्त्यांचा मागावा
घायचं ठरवलं होत मनाने ……जवळ आल्यावर दिसलं त्या दोन्ही बुद्धांच्या मुर्त्या होत्या ……। त्यावर बारीक नक्षी काम  केलं  होतं........... डोळ्यांवर नीजेलेल  भाव होते ..........  मी कुठे होतो? काही आठवत नव्हत.  आपण इथे कसे आलो ते? ……… ह्या मुर्त्या?..अश्या निर्जन स्थळी कश्या काय? आजू बाजूला फक्त हिरव गवत दिसत होतं ........... जसं जसं  पुढे चालत गेलो एक विचित्र गोष्ट जाणवली …… त्या दोन्ही
मूर्त्यांच्या मध्ये एक डोह होता ..... खूप गहिरा …………. डोह ..... त्या डोहाच्या जवळ जाउन मी बसलो ............. जणू कोणी मला तिथे बसायला सांगितलं होतं ....... पण कोणी ? आणि का? अश्या अवस्थेत… अडकल्यानंतर .......... मती भ्रष्ट झाली  होती , डोहातून पाण्याचा आवाज येत होता ………… जणू कोणी त्यात मोठा दगड भिरकावतय  ....

         "अचानक"....... वातावरण बदलल ……वरच तांबडं आता  काळं झालं होतं ……जोरजोरात वारा वाहू लागला ........ जणू आता वादळच आलं होतं .........माझा तोल मला सावरत नव्हता …… मी डोहापासून मागे जाण्याचा प्रयत्न केला. दोन्ही हात मागे टेकवून कसाबसा  उठलो ..... मला काहीच दिसत नव्हत …। फक्त अंधार होता ………। पावलं टाकत … सावरत चालताना ……।अकस्मात पायाखालची जमीन गायब झाली ……आणि मी सरळ डोहात पडलो …………… काही समजण्याच्या आत ……मी आत शिरलो ……पाण्यात श्वास गुदमरायला झाला ………. डोळे बंद करून..पुन्हा उघडण्याचा प्रयत्न केला
.......... पण  अंधारच होतां फक्त …… हात पाय जोरात हलवले  जीवं वाचवण्याची ती धडपड सारी …… श्वासोच्वास जोरात चालू लागला ……। तिथून तेवढ्यात तिथून एक किंकाळी ऐकू आली ……. मी सुन्न झालो होतो …….कुणीतरी पुटपुटल्याचा आवाज येत होता .........  "हे त्याच sub conscious mind आहे
......... त्याला काय जाणवतंय हे आपल्याला नाही कळू शकणार .........." काळजात धस्स झालं …, मी बेडवर होतो ......... हॉस्पिटल च्या .........डॉक्टर बाजूला उभे होते ……। ते अवाक होऊन पाहत होते माझ्याकडे ........
अन मी पण त्यांच्याकडे ………

Comments

Popular posts from this blog

निशा - एक हृदयस्पर्शी कथा