नो स्मोकिंग

नो स्मोकिंग :

गोष्ट सुरु होते ते, कडेगाव तालुक्यातील लहान श्या गावातील । कडेपूर हे तसं शहरगाव, पण त्याच जवळ भाळवणी नावाचे एक लहानसे गाव आहे .  या गावाची ओळख म्हणजे, इथे भरणारा बाजार, शेतातली ताजी फळे, भाज्या एवढंच न्हवे तर विविध प्राण्यांचा सुद्धा बाजार भरतो बैल,बकरी वगैरे. बऱ्याच गावातून लोकं इथे बाजाराला यायचे

कडेपुरात एक शेतकरी राहत होता, त्याचे नाव मनोहर. मनोहर दिवसभर शेतात राबायचा, त्याची बायको घर सांभाळायची। अधूनमधून बाजारानिम्मित त्याला भाळवणी ला जाव लागायचं.  भाळवणी गावावरून परती  ची शेवटची एस. टी. ती संध्याकाळी ७ ची. ही एस. टी.चुकली तर चालत येण्याशिवाय पर्याय राहत नाही.  मनोहर ने शेतातला उस विकून नुकत्याच आलेल्या मिळकतीत शेळ्या घ्यायचे ठरवले. जेणे करून त्याच्या संसाराला हातभार लगेल.  मनोहर ने बायकोला विचारलं तिने सुद्धा समंती दिली . शेळ्या विकत घेण्यासाठी एके दिवशी मनोहर भाळवणी च्या बाजाराला जायला निघाला. शेवटची एस टी चुकावाल्यास रात्री परत यावा लागणार ह्याची कल्पना असल्यामुळे त्याने battery आणि त्याची आवडती बीडी घेतली होती सोबत.

शेतातली राहिलेली कामं आवरून तो संध्याकाळच्या ४  च्या  एस. टी. त बसला. भाळवणी त पोहचल्यावर तो सर्वात आधी शेळ्या विकणाऱ्या एका माणसाकडे वळला. तो माणूस म्हणजे सलीम, भाळवणी मधेच राहणारा .. मोठे डोळे, लांब दाडी, लुंगी नेसलेला.. दिसायला भयानक.. मनोहर म्हणाला "दोन शेळ्या हव्यात अन एक बोकड ".  सलीम म्हणाला "सबसे अच्छा ये है " एका बोकडा कडे हात दाखवत म्हणाला , त्याच्या कडे बर्याच शेळ्या आणि बोकड होते . पण ते बोकड धष्टपुष्ट होत .. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती .. मनोहर ने त्या शेळ्यांच्या कळपातून ते बोकड आणि दोन लहान शेळ्या विकत घेतल्या. व्यवहार संपता संपता उशीर झाला. अन स्टेंड वर पोहचता पोहचता शेवटची एस. टी. सुटली.

आता चालत जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता.. मनोहर ने घरी लवकर परतण्यासाठी जुनी वाट धरली. चालता चालता त्याच्या डोक्यातलं  विचारचक्र सुरु होतं । झालेल्या व्यवहारावर वर मनोहर खुश होता, या जनावरांमुळे त्याला बराच फायदा होणार होता, ह्यातले एक बोकड नंतर विकून बायको साठी काही दागिने करूयात असं त्याने मनात ठरवलं होतं .
बरंच अंतर चालल्यावर, धामणी गावाच्या रानात एक पाण्याचा ओढा लागतो, मग तिथून पुढली वाट वेगवेगळ्या पडून राहिलेल्या वावरातून होती … ह्या शेताचं विशेष म्हणजे इथे त्यांच्या मालकांना खूप वाईट अनुभव आले होते ... म्हणून भीतीने हि शेतं तशीच पडून होती … त्यात कमीत कमी एका माणसाच्या उंचीचे तन वाढलेले होते  ……… त्यात कोल्ह्यांची भीती असल्यामुळे शेतमालक घरा जवळचीच शेतीकडे जास्त लक्ष देत असत ।

रात्रीचे १०. वाजत  आले होते, मनोहर आपल्या विकत घेतलेल्या शेळ्यांची दावण पकडून होता ...एका अडसर वाटेवर मधेच काही पावलांचा आवाज आला ..... मनोहर तिथेच थबकला ……. पूर्ण अंधार होता ……। आजू बाजूला फक्त झाड झुडपं होती ..... मनोहर ने कानोसा घेतला .... पावलांचा आवाज आता अजून जोरात येऊ लागला असं वाटत होतं कि कुणीतरी त्याच्याकडे धावून येतंय

आवाज जास्तच जोरात येऊ लागला तसा मनोहर घाबरला ....... तो खाली बसला आवाज जास्त जोरात आला आणि अचानक हातातली दावणी सुटली … कारण ते बोकड त्या आवाजाला घाबरून पळत सुटलं ...
मनोहर ला काही समजण्याच्या आत ते बोकड त्या झाडा झुडपातून आत शिरलं

 मनोहरमनातल्या मनात बोलला "आता काय करू मी ? हे बोकड तर माझ्यासाठी महत्वाच आहे … त्याने मनाशी विचार पक्का केला, आणि त्य बोकडाचा शोध घेण्याच ठरवलं 

Comments

Popular posts from this blog

निशा - एक हृदयस्पर्शी कथा