डोह - ४
"हो सर, मी ताबडबोब पाटील आणि सावंत ना घेऊन येतो " हवालदार जाधव फोनवर बोलत होते. तेवढ्यात मागून आवाज आला "जाधव , कोणाचा फोन आहे ? " इन्स्पेक्टर सावंत यांनी हवालदारांना विचारले . हवालदार जाधव फोन ठेवत म्हणाले "इन्स्पेक्टर सोनावणे यांचा कॉल होता, त्यांनी तातडीने मुकेश मिल्स ला बोलावलं आहे , एक मर्डर केस आहे " "चला गाडी काढा जाधव " इन्स्पेक्टर सावंत बोलले. श्रीधर सावंत, वय ३५ वर्ष, दिसायला रुबाबदार, अंगापिंडाने धडधाकट, पीळदार मिश्या आणि तांबडे डोळे . इन्स्पेक्टर बनून त्यांना नुकतीच २ वर्ष झाली होती, कुलाबा पोलीस स्टेशन मध्ये त्यांची पोस्टिंग २ वर्ष आधीच झाली होती. पोलीस ठाण्यात त्यांना भरपूर मान होता, कुलाबा मधील सर्व गुंड त्यांना घाबरून राहायचे. दुपारचे दोन वाजले होते, जाधव जीप घेऊन बाहेर आले, इन्स्पेक्टर सावंत आणि हवालदार पाटील लगेचच बसले. आणि जीप सुरु झाली. "जाधव, मुकेश मिल्स isn't that a secluded place ?" इन्स्पेक्टर सावंत बोलले, जाधव मान हलवत म्हणाले "हो, इथं मागच्यावेळी रेप केस आली होती ४ वर्ष आधी ". ...