डोह - ४


"हो सर, मी ताबडबोब पाटील आणि सावंत ना घेऊन येतो " हवालदार जाधव फोनवर बोलत होते. तेवढ्यात मागून आवाज आला "जाधव , कोणाचा फोन आहे ? " इन्स्पेक्टर सावंत यांनी हवालदारांना विचारले .

हवालदार जाधव फोन ठेवत म्हणाले   "इन्स्पेक्टर सोनावणे यांचा कॉल होता, त्यांनी तातडीने मुकेश मिल्स ला बोलावलं आहे , एक मर्डर केस आहे "

"चला गाडी काढा जाधव " इन्स्पेक्टर सावंत  बोलले.  श्रीधर सावंत, वय ३५ वर्ष, दिसायला रुबाबदार, अंगापिंडाने धडधाकट, पीळदार मिश्या आणि तांबडे डोळे .  इन्स्पेक्टर बनून त्यांना नुकतीच २ वर्ष झाली होती,  कुलाबा पोलीस स्टेशन मध्ये त्यांची पोस्टिंग २ वर्ष आधीच झाली होती. पोलीस ठाण्यात त्यांना भरपूर मान होता, कुलाबा मधील सर्व गुंड त्यांना घाबरून राहायचे.

दुपारचे दोन वाजले होते, जाधव जीप घेऊन बाहेर आले, इन्स्पेक्टर  सावंत आणि हवालदार पाटील लगेचच बसले. आणि जीप सुरु झाली.

"जाधव, मुकेश मिल्स isn't that a secluded place ?" इन्स्पेक्टर सावंत बोलले, जाधव मान हलवत म्हणाले "हो, इथं मागच्यावेळी रेप केस आली होती ४ वर्ष आधी ".  "अच्छा , हीच केस आहे ती ज्यात आपण अजून योग्य ते पुरावे गोळा नाही करू शकलोत ". पाटील यांनी हो म्हणत मान डोलावली.

पोलिसांची गाडी कुलाबा मार्केट मधून निघाली, दोन्ही बाजुंना समुद्र, गार वारा सुटला होता.

मुकेश मिल्स च्या मेन गेट ला गाडी आत घेतली, दोन्ही बाजूनी विराण पडलेली मिल होती, भयानक भिंती, ८२ मध्ये झाले lyaभीषण आगीचे ठसे अजून दिसत होते , चित्रविचित्र पडलेल्या भिंती,  स्मशान शांतता आणि मधेच जोरात कावळ्याची कावकाव ... ऐकूनच भीतीदायक जागा होती ती.

इन्स्पेक्टर सोनावणे जीप जवळ उभे होते. इन्स्पेक्टर सावंत आपल्या टीम सोबत तिथे पोहचले. पाहताच क्षणी सोनावणे सावंत ना बोलले, "नमस्कार साहेब, हा मर्डर रात्री ३ च्या सुमारास झालाय अस प्रथमदर्शी निदर्शनात आले,ह्या महिलेची अद्याप ओळख पटू शकली नाही ".  "तुम्हाला माहिती कोणी दिली ? " सावंत यांनी विचारले.
तो चरसी मंग्या इथे होता,  त्याने सर्वप्रथम पाहिलं आणि पोलिसांना कळवले . मंग्या तिथेच उभा होता, लाल डोळे , वाढलेले केस आणि त्याचे मळके कपडे पाहून तो एक खुनीच वाटत होता. सावंत ने त्याला पुढे बोलावले, "नमस्ते साहेब" मंग्या म्हणाला . "तू इथे काय करत होतास ? " सावंत बोलले. मंग्या बावरलेला होता .  त्याचे थरथरते हात बघून सावंत जोर देत परत बोलले, "तू इथे काय करत होतास?" "मी.. मी हिथं फिराय आलू हुतु " मंग्या घाबरत घाबरत बोलला.  "खरं सांग, नाहीतर पोलिसांच्या पद्धतीने चौकशी केली तर तुला महाग पडेल ". इन्स्पेक्टर सावंत ह्यांचा भारदस्त आवाज ऐकून मंग्या अजूनच घाबरला. "साहेब, मी इथं चिलीम मारायला येतो , काल  बी आलो हुतो तेव्हा हि बघितलं, बराच वेळ घाबरलू हुतु मग माझ्या मित्राला फोन केला तो म्हणाला पोलिसांना कळवळच पाहिजे म्हणून कळवलं", "साहेब, मी काय बी न्हाई केलं " रडक्या स्वरात मंग्या बोलला. "ठीक आहे, नाव पत्ता फोन नंबर घ्या ह्याचा जाधव, आणि इथून कुठे पळून गेलास तर तुला तुरुंगात आयुष्य काढावं लागेल हे मी खात्रीने सांगु शकतो " सावंत बोलले .  मंग्या घाबरत घाबरत हो म्हणाला . 
इन्स्पेक्टर सावंत बॉडी च्या जवळ गेले .आजूबाजूला पूर्ण रक्त पडले होते, चेहरा नीट दिसत नव्हता , साडी पिवळ्या रंगाची होती, ती रक्ताने माखली होती, कुणीतरी तिचा गळा चिरला होता. खूपच क्रूरतेने तिचा मर्डर झाला होता. "आजूबाजूला काही सापडलं का ? मर्डर वेपोन ?" इन्स्पेक्टर सावंत बोलले. "टीम अजून शोधाशोध करत आहे साहेब " सोनावणे बोलले .

फोटोग्राफर वेगवेगळ्या अँगल ने बॉडी चे फोटो काढत होते, अनेक घारी तिथे जमल्या होत्या.  "लवकर बॉडी पोस्टमॉर्टेम ला पाठवा  आणि जाधव त्या मंग्या वर नजर ठेवा " असं सावंत बोलले.
 

Comments

Popular posts from this blog

डोह - 3

डोह - १

डोह - २